Maratha Reservation:'मराठा समाजासाठी ठोस पावले उचला' | Vinod Patil | State Government | Sakal Media<br />औरंगाबाद (Aurangabad): मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) केंद्र सरकारने घेतलेल्या राज्य सरकारला अधिकार देण्याच्या निर्णयामुळे आरक्षणाची वाट सुकर झाली आहे आणि मराठा तरुणांचा त्रास कमी झालाय. पण अद्याप अनेक मराठा तरुणांची अवस्था दयनीय असून त्यांचे भविष्य अंधारात आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी परिस्थिती अपवादात्मक नाही असे न्यायालयाकडून(Court) सांगण्यात आले होते. मग अपवादात्मक परिस्थितीचे काय निकष आहेत यावर चर्चा करावी आणि आता राज्य सरकारने (State government)ठोस पावले उचलून मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले पाहिजे. अशी मागणी विनोद पाटील (Vinod Patil)यांनी केली आहे.<br />#Marathareservation #Aurangabad #VinodPatil #Aurangabad